पुणे : मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकलींची चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. दाम्पत्याने सिंहगड रस्ता भागात रखवालदार नसलेल्या सोसायटीतून सायकली चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांच्या १४ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय राजेंद्र पाठक (वय ३६, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. नवरेनगर, अंबरनाथ, जि. ठाणे), डायना डेंझिल डिसोजा (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरातील एका सोसायटीतून महागडी सायकल चोरीस गेली होती. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. वडगाव पुलाजवळ दोन दिवसांपूर्वी एक दाम्पत्य दुचाकीवरुन सायकल घेऊन निघाले होते.

हेही वाचा : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कतेचे आदेश; लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाजवळ बंदोबस्त

गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सागर शेडगे, राहुल ओलेकर यांनी त्यांना पाहिले. संशय आल्याने दुचाकीस्वार पाठक आणि डिसोजा यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी सायकल चोरीची कबुली दिली. मौजमजेसाठी त्यांनी सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांच्या १४ सायकली जप्त करण्यात आल्या.

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शाळांमध्ये ‘स्कूल वेलनेस टीम’; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ‘उम्मीद’ मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, संजय शिंदे, सागर शेंडगे, राहुल ओलेकर, अमोल पाटील, देवा चव्हाण आदींनी ही कामगिरी केली.

आयटी कंपनीतून बदली झाल्याची बतावणी

पाठक आणि डिसोजा उच्चशिक्षित आहेत. डिसोजा आणि पाठक यांचा प्रेमविवाह झाला आहे. डिसोजा एका काॅलसेंटरमध्ये काम करत होती. पाठक बेरोजगार आहे. मौजमजा करण्यासाठी दोघांनी रखवालदार नसलेल्या सोसायटीतून महागड्या सायकली चोरल्या. माहिती-तंत्रज्ञान कंपनीतून बदली झाली आहे. सायकल स्वस्तात विकायची आहे, असे सांगून आरोपी महागड्या सायकलींची विक्री करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune highly educated couple arrested for stealing expensive bicycles pune print news rbk 25 css
Show comments