पुणे : घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली. महिलेकडून साेन्याचे दागिने, रोकड, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ऋतुजा राजेश सुरुशे (रा. ॲसेम्ब्ली चर्चजवळ, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव शेरी भागातील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार ५२ वर्षीय महिला १७ फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्या २५ फेब्रुवारी रोजी गावाहून परतल्या. त्या वेळी घरातील कपाटातून २७ ग्रॅेम सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस आले होते. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात तक्रारदार महिलेच्या घरात काम करणारी महिला ऋतुजा सुरुशे हिने चोरी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या घरातून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि साडेपाच हजारांची रोकड जप्त करण्यात आली. चौकशीत सुरुशेने जुन्या मुंढवा रस्त्यावरील एका महिलेच्या घरातून ६० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे उघडकीस आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा