पुणे : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात सप्टेंबर महिन्यात झालेल्या दंगलीच्या घटनेचा तपास सीबीआय आणि एनआयए मार्फत व्हावा, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेचे सदस्य अविनाश मोकाशी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच आम्ही या प्रकरणाचा अहवाल तयार केला असून संबधित तपास यंत्रणांना पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी अविनाश मोकाशी म्हणाले की, समाज माध्यमांवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यावरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात सप्टेंबर महिन्यात दोन गटात हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले. तर त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमच्यातील काही सदस्यांनी पुसेसावळी गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी दंगल घडल्यानंतर खूप उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर दंगलीत सहभागी नसणार्‍या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच बरोबर ज्या व्हॉटसअॅप ग्रुपवरुन भांडण झालं, त्यामध्ये पाकिस्तानमधील काही नंबरचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह अनेक मुद्दे नागरिकांसोबत संवाद साधल्यानंतर समोर आले आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीच्या घटनेचा तपास सीबीआय आणि एनआयए मार्फत झाला पाहिजे, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य

तसेच ते पुढे म्हणाले की, सातारा येथील दंगल घटनेचा भारतीय मानवाधिकार परिषदेमार्फत अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबधीत असणार्‍या तपास यंत्रणांना हा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे मोकाशी यांनी सांगितले.