पुणे : घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने महिलेचा खून केल्याप्रकरणी न्यायालायाने पती, सासऱ्याला जन्मठेप आणि प्रत्येकी ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी याबाबतचे आदेश दिले. दंडाच्या रकमेपैकी एक लाख रुपये महिलेच्या आई-वडिलांना द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पती कांताराम सत्यवान ढगे (वय २७), सासरे सत्यवान बबन ढगे (वय ५७) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात सासू बायसाबाई ढगे (वय ४०) यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. दीपाली कांताराम ढगे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. १० एप्रिल २०१३ रोजी ही घटना घडली होती. पती कांताराम, सासरे सत्यवान, सासू बायसाबाई यांनी दीपाली यांच्याकडे घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तिचा छळ करुन मारहाण करत होते. तिने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिचा खून केला. तिचे शिर धडावेगळे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंबरोबर कसा? व्हायरल फोटोवर सुषमा अंधारे म्हणाल्या…

या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती ॲड. पाठक यांनी युक्तिवादात केली होती. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक फौजदार विद्याधर निचित, एस. बी. भागवत यांनी सहाय्य केले.

Story img Loader