पुणे : जेवणात खर्डा न दिल्याने महिलेवर चाकूने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुप्रिया पंकज पाचारणे (वय ४०, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पंकज मच्छिंद्रनाथ पाचारणे (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुप्रिया यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पंकज रिक्षाचालक आहे. रविवारी सायंकाळी तो घरी आला. त्याने पत्नी सुप्रिया यांना मिरचीचा खर्डा करुन देण्यास सांगितले. तेव्हा तुम्ही मिरची घेऊन या. मी खर्डा करून देते, असे सुप्रियाने सांगितले.

हेही वाचा : ‘तटस्थ’ मनसे आणि पुणेकरही!

या कारणावरुन पंकज चिडला आणि त्यांच्या कानाखाली मारली. तेव्हा त्यांचा मुलगा आर्यनने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वयंपाक घरातून चाकू आणला. आर्यनला मारण्यासाठी चाकू उगारला. झटापटीत सुप्रिया यांच्या डाव्या डोळ्याजवळ चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या. पोलीस हवालदार तेजपाल तपास करत आहेत. किरकोळ वादातून टोकाची भांडणे होण्याच्याा घटना वाढीस लागल्या आहेत. नऱ्हे भागात शनिवारी मध्यरात्री एका मद्यालायत जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाने मित्राच्या ताटात हात घातल्याने वाद झाला. त्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

Story img Loader