पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन एकाने पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाेलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७, रा. मुंजाबा वस्ती, धानाेरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, याप्रकरणी पती मनोहर मोरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. मोरे दाम्पत्य धानोरीतील मुंजाबा वस्ती परिसरात राहायला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोहर हा माधुरी यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्यांचा छळ करत होता. त्यांना मारहाण करायचा. रविवारी मध्यरात्री मोरे दाम्पत्यात पुन्हा वाद झाला. मनोहरने स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरची टाकी माधुरी यांच्या डोक्यात मारली. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. गंभीर जखमी झालेल्या माधुरी यांचा जागीच मृत्यू झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा