पुणे : पुणे शहरात सप्टेंबर महिन्यात सरासरी १४३.६ मिमी पाऊस पडतो. बुधवारी दुपारी दोनच तासांत १२४ मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या ९० टक्के पाऊस दोन तासांत झाला. मंगळवारपर्यंत (२४ सप्टेंबरपर्यंत) शहरात फक्त ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकू जून ते बुधवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत पुणे शहरात एकूण ११०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भर दुपारी तीनच्या सुमारास आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी झाली. अंधारून आलं, ढगांचा गडगडाट झाला अन् तुफान पाऊस सुरू झाला. सव्वा दोनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस पावणे चारपर्यंत अक्षरश: कोसळत होता. मुसळधार पावसामुळे जंगली महाराज रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आले होते. गुडघाभर पाणी रस्स्त्यावरून वाहत होते.

हे ही वाचा…राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो

शहरात कुठे, किती पाऊस

शहरात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये सर्वांधिक १२७.५, शिवाजीनगरमध्ये १२४ मिमी पाऊस झाला. त्या खालोखाल वडगावशेरीत ७१.५, कोरेगाव पार्क ६३.०, एनडीए ४२.०, हडपसर ३८.०, पाषाण १९.८ आणि हवेलीत १२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा फार जोर नव्हता. नारायणगावात ५५.०, खेडमध्ये ४१.०, भोरमध्ये ३०.० लोणावळ्यात २६.० आणि बारामतीत २१.० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा…पुणे :आरक्षण संपवणे ही काँग्रेसची मानसिकता, भाजपच्या खासदाराचा घणाघात

पुण्याला आज नांरगी इशारा

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासह शहराला नारंगी इशारा दिला आहे. वादळी वारे, मेघर्गजनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी ढगाळ वातावरण राहून, दुपारनंतर वादळी वारे, मेघर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune in month of september on wednesday afternoon 124 mm of rain fell in just two hours pune print news dbj 20 sud 02