पुणे : उन्हाचा तडाखा, तसेच अवकाळी पावसामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. भुईमुग शेंगांची आवक वाढल्याने दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (२१ एप्रिल) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून प्रत्येकी ३ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, २ ते ४ टेम्पो घेवडा, पावटा २ ते ३ टेम्पो, भुईमूग शेंग ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ७ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १ ट्रक गाजर, हिमाचल प्रदेशातून ६ ट्रक मटार, मध्य प्रदेशातून १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

हेही वाचा : बुधवार पेठेत बांगलादेशी घुसखोर… किती जण अटकेत?

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ७ हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, पारनेर भागातून २ टेम्पो मटार, भुईमुग शेंग २५ ते ३० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, १०० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ३० ट्रक बटाटा अशी आवक झाली.

हेही वाचा : ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे

बाजारातील पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ७० हजार जुडी अशी आवक झाली. किरकोळ बाजारात एक जुडी मेथी, कोथिंबिरेचे दर २० ते २५ रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.