पुणे : एरंडवणे भागातील एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना कामगार २० ते २५ फूट उंचावरून खड्ड्यात पडला. कामगार तरुणाच्या खांद्यातून सळई आरपार गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने मदत करून रुग्णालयात दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरंडवणे भागातील शारदा सेंटर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी २० ते २५ फूट उंचीवरून एक मजूर खड्ड्यात पडला. खड्ड्यातील सळई त्याच्या खांद्यातून आरपार गेली. या घटनेची माहिती एरंडवणे अग्निशमन केंद्रातील जवान सचिन क्षीरसागर, अनंत जाधव, सचिन आयवळे, सागर मुंढे, राहुल वाघमोडे, आशुतोष पिंगळे, निलेश पाटील, कमलेश माने, सुमित कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी जखमी अवस्थेतील तरुणाला खड्ड्यातून बाहेर काढले. त्याच्या खांद्यात शिरलेल्या सळईचा एक भाग हायड्रोलिक यंत्राचा वापर करून कापला. जवानांनी कामगाराशी संवाद साधून धीर दिला.

या घटनेची माहिती बांधकाम प्रकल्प व्यवस्थापकांना दिली. घटनास्थळी डाॅक्टरांना पाचारण करण्यात आले. डाॅक्टरांनी प्रथमोपचार करून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालायत दाखल केले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे जखमी कामगाराला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध झाली.