पुणे : कर्वेनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने किरकोळ वादातून एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली.
ओंकार विजय स्वामी (वय २७, रा. गगनगिरी कॉलनी, कोथरुड) असे जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी हेमंत ऊर्फ लोकेश सुरेश माथवड (वय २९, रा. कोथरूड ), शुभम रामभाऊ मोकाटे (वय २९, रा. आझादनगर, कोथरुड), नचिकेत ऊर्फ अजिंक्य गंगाधर ओव्हाळ (वय २६, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरुड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश चव्हाण यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हेही वाचा…‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कर्वेनगर भागातील एका रेस्टोरंट बारमध्ये दारु प्यायले गेले. शनिवारी मध्यरात्री ते बारसमोर थांबले होते. त्यावेळी त्यांची किरकोळ वादातून स्वामी याच्याशी भांडणे झाले. आरोपी मोकाटेने त्याच्या पाठीत फरशी घातली. माथवडने त्याला कुंडी फेकून मारली. त्यानंतर स्वामी तेथून पळाला.
हेही वाचा…बी. टी. कवडे रस्ता भागात सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट
आरोपींनी त्याला कर्वे रस्त्यावरील एका हाॅटेलजवळ पाठलाग करुन पकडले. त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत स्वामी बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd