पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. कात्रज बाह्यवळण मार्गावर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.

केशव अशोक राठोड (वय २५, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कात्रज बाह्य‌ळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ राठोड थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक शाहिद शेख, दत्तात्रय पवार, गणेश ढगे, बाळू गायकवाड, धनंजय ताजणे यांनी ही कारवाई केली.

Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Pune, Crime, Cop-24 , Police Patrol,
पुणे : रस्त्यांवरील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप – २४’, पोलिसांकडून आता अहोरात्र गस्त; ७२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त

हेही वाचा…पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा

तडीपार गुंड अटकेत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक वारजे भागात गस्त घालत होते. शहरातून तडीपार करण्यात आलेला गुंड पियूष उर्फ कान्हा सतीश जाधव (वय २०, रा. वारजे जकात नाका) आदेशाचा भंग करुन वारजे भागात आल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही…डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार

बेकायदा सावकरी प्रकरणात एक गजाआड

बेकायदा सावकारी आणि खंडणीच्या गु्न्ह्यात फरार झालेल्या एकाला अटक करण्यात आली. नाविद मुक्तार शेख (वय ३३, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. तो वारजे भागात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी रवींद्र गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.

Story img Loader