पुणे : शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतर येरवडा आणि लोहगाव भागात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या. येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय ४०, रा. भोरी चाळ, पांडू लमाण वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी चव्हाण आणि परदेशी ओळखीचे आहेत. चव्हाण आणि साथीदार शनिवारी पांडू लमाण वसाहतीत शिरले. त्यांनी शिवीगाळ करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला. कोयते उगारून दहशत माजविली. परदेशी यांचा भाचा अनिकेत सोनकरला मारहाण केली. या भागातील वाहनांची तोडफोड करून टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

हेही वाचा : बारावी, दहावीच्या परीक्षेचं टेन्शन आलंय? सहज आणि मोफत मदत मिळणार!

लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. या प्रकरणी करण विजय दोरकर (वय १९, रा. पठारे वस्ती, लोहगाव), शाबाद आयुब ओैटी (वय १८, रा. मुंजाबा वस्ती, लोहगाव), तसेच दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल अनंत कानू (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोरकर, ओैटी आणि अल्पवयीन साथीदार लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आले. त्यांनी जुबेर कोठे राहतो, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. दोन रिक्षांच्या काचांवर दगडफेक केली. सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल तपास करत आहेत.

Story img Loader