पुणे : वडिलांवर कोयत्याने वार करुन त्यांचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सचिन अंबादास खोत (वय २७, रा. ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. आरोपी सचिनने वडील अंबादास दिगंबर खोत (वय ५२) यांच्यावर कोयत्याने वार करुन खून केला होता. २९ सप्टेंबर रोजी २०१४ रोजी ही घटना घडली होती. नातेसंबंधातील एका महिलेकडे अंबादास वाईट नजरेने पाहत होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद ‌झाले होते. २९ सप्टेंबर रोजी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सचिनने वडिलांवर कोयत्याने वार करुन खून केला. याप्रकरणी सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंग शेंगर यांनी तपास केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आराेपपत्र दाखल केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ललिता कानवडे यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य ‌धरुन आरोपी खोत याला जन्मठेप, तसेच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची तरतूद न्यायालायने निकालपत्रात केली आहे.