पुणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर कोयता आणि चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी पतीस न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भाेगावा लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. भालचंद्र गिराप्पा सुर्वे (वय ३७, रा. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. आराेपी भालचंद्रने पत्नी अर्चनाचा २८ जुलै २०१९ रोजी सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची येथील राहत्या घरात खून केला होता. याबाबत अर्चनाचे वडील दत्ता बाबूराव बागडे (वय ५४, रा. ऊरळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अर्चनाचा भालचंद्रशी २००८ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. दोघांमध्ये भांडणे होत असल्याने अर्चना दोन मुलांसह जानेवारी २०१८ मध्ये माहेरी निघून आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा