गणेशोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य भागातील मद्यविक्रीची दुकाने, तसेच मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. या आदेशामुळे मध्य भागातील मद्यविक्री दुकाने सलग दहा दिवस बंद राहणार आहेत. अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असून, या आदेशाचे स्वागत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी कौतुक केले. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुढील वर्षी शहर, जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने दहा दिवस बंद केल्यास खऱ्या अर्थाने पावित्र्य जपले जाईल, अशीही भावना व्यक्त करण्यात आली.

पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. गणेशोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागांतून भाविक पुण्यात येतात. भाविकांसह परदेशी पर्यटक उत्सवात आवर्जून हजेरी लावतात. पुण्यातील गणेशोत्सवाचा लौकिक जगभरात पसरला असून, एकदा तरी उत्सव पाहायचा, अशी इच्छा बाळगून अनेकजण पुण्यात येतात. गणेशोत्सवापूर्वी महिनाभर आधी कार्यकर्ते आणि पोलीस तयारीला लागतात. पोलीस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. बैठकांचे आयोजन केले जाते. महिनाभरापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. गणेशोत्सवात मध्य भागातील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली. पोलीस आयुक्तांनी कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. मद्यविक्री दुकाने बंद करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील खडक, फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्ताव मान्य करून गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले.

sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ
work of Gavhan station is incomplete
गव्हाण स्थानकाचे काम अपूर्णच! लोकल स्थानकात थांबण्याची प्रवाशांना अद्याप प्रतीक्षाच

हेही वाचा : पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी

या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू झाली. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमुख गणेश मंडळे आहेत. मध्य भागातील मद्यविक्री बंद करण्यात आल्यानंतर इच्छुकांपर्यंत मद्य पोहोचणारच नाही, असे होणार नाही, हेही खरेच. कारण, ज्या भागांत किंवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मद्यबंदीचे आदेश लागून करण्यात आले आहेत, तेथून काही मिनिटांच्या अंतरावर असलेली मद्यविक्री दुकाने, मद्यालये खुली आहेत. उदाहरण म्हणून पाहिल्यास शनिवार पेठेतील मद्यविक्री दुकान बंद असली, तरी तेथून अवघ्या दाेन ते तीन मिनिटांच्या अंतरावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग येत असल्याने या भागात मद्यबंदी लागू नाही. परिणामी, येथून मद्यविक्री आणि पुरवठा होऊ शकतोच आहे. त्यामुळे मद्यविक्री बंदीची प्रभावी अंमलबजावणी हा मुद्दा राहणार आहेच. त्यासाठीच मद्यबंदी करायची असेल, तर पुढील वर्षी संपूर्ण शहरात करावी, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा : Hinjewadi IT Park : जबाबदारीची अशी ही ढकलाढकली! वाहतूक कोंडीबाबत चार सरकारी यंत्रणांचे एकमेकांकडे बोट

पुण्याच्या गणेशोत्सवावर काहीजण हस्तिदंती मनोऱ्यात बसून टीका करतात. मात्र, उत्सवाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो, समाजोपयोगी कामे उभी राहतात, मंडळांच्या माध्यमातून समाजभान येते, उत्तम संघटक, कार्यकर्ता घडतो, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्थात, उत्सवाच्या बदलत्या स्वरूपातील विधायक नसलेल्या अनेक गोष्टी बंद करायला हव्यात, यात कुणाचेही दुमत असणार नाही. पण, काही मंडळे उत्सवातील डामडौल जपून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत, त्याचेही कौतुक व्हायला हवे. पुण्यातील अनेक मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवाकडे फक्त दहा दिवसांचा उत्सव म्हणून पाहत नाहीत. वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात मंडळे अग्रेसर असतात. परिसरातील गरजू नागरिक, विद्यार्थ्यांना मदतही केली जाते. अलीकडच्या काळात तर अनेक मंडळांचे कार्यकर्ते उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे विधायक कामांबरोबरच उत्सवाचे पावित्र्य जपायला हवे, अशी भावना कार्यकर्त्यांचीही आहे. मद्यविक्रीवर बंदीची मागणी त्यातूनच आली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. यंदाच्या मद्यविक्रीवरील बंदीआडून काहीजण गैरप्रकार करतील. जादा दराने मद्यविक्री करतील. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी फक्त पोलीसच नव्हे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सजग असणे गरजेचे आहे.
rahul.khaladkar@expressindia.com