पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हंगामात वरसगाव आणि पानशेत ही धरणे १०० टक्के भरली, टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. तसेच खडकवासला धरण हंगामात दोनवेळा १०० टक्के भरले, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने या धरणातील पाणीसाठा ४५ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. परिणामी या चारही धरणांमधून मुठा नदीत यंदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. खडकवासला धरणातून मुठा नदीत यंदा केवळ १.१० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढाच विसर्ग करण्यात आला. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वात नीचांकी पाण्याचा विसर्ग ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुणे : इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीला आग, काही मिनिटांत गाडी जळून खाक!

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. त्यामुळे उजनी धरण भरण्यास मदत होते. यंदा चारही धरणे भरलेली नसल्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरू शकलेले नाही. सध्या उजनी धरणात केवळ ३०.६१ टीएमसी (५७.१३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

हेही वाचा : ललित पाटीलमुळे चर्चेत आलेला ससूनमधील ‘व्हीआयपी’ कक्ष इतिहासजमा होणार

दरम्यान, यंदा संपूर्ण हंगामात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५८८ मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे १६४६ मि.मी. आणि १६३४ मि.मी. पाऊस पडला आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ ५८५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांतील खडकवासला धरणातून मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग

  • सन २०१८ मध्ये सुमारे २० टीएमसी पाणी खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात आले होते.
  • सन २०१९ मध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत पाऊस लांबल्याने या वर्षी सुमारे २० टीएमसीपेक्षा जास्त पाणी नदीत सोडण्यात आले.
  • सन २०२० मध्ये खडकवासला धरणातून मुठा नदीत १२.७५ टीएमसी पाणी सोडण्यात आले.
  • सन २०२१ मध्ये देखील पाऊस कमी होता. या वर्षी खडकवासला धरणातून ६.५४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले.
  • सन २०२२ मध्ये खडकवासला धरणातून १६ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले.
  • सन २०२३ खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १.१० टीएमसी पाणी सोडण्यात आले.