पुणे : महागडी मोटार खरेदीसाठी बँकेकडे बनावट कागदपत्रांद्वारे १८ लाखांचे कर्ज प्रकरण सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चैतन्य श्रीकांत नाईक (रा. तुकाईनगर, वडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपाली बाळकृष्ण आठल्ये (वय ४३, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाईकने महागडी मोटार खरेदीसाठी एका वाहन विक्री दालनाच्या नावे सिंहगड रस्त्यावरील विद्या सहकारी बँकेत शाखेत कर्जप्रकरण सादर केले होते. नाईकने बँकेकडून १८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज मागितले होते. बँकेकडून त्याला वाहन कर्जापोटी १८ लाख रुपये मंजूर केले.

हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत वाढ

त्यानंतर त्याने कल्याणीनगर येथील एका आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत बनावट नावाने खाते उघडून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम जमा केली. बँकेला स्काय मोटो ॲटोमोबाइलच्या नावे बनावट पावती दिली. करारानुसार आरोपीने मोटार खरेदी केली नाही. नाईक यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी नसलेली मोटार बँकेतील अधिकाऱ्यांना दाखवून फसवणूक केल्याचे बँक व्यवस्थापक दीपाली आठल्ये यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune man cheats bank of rs 18 lakh for car loan with fake documents pune print news rbk 25 psg