पुणे : मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा मंगळवारी (२३ जानेवारी) नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत. त्यानिमित्ताने नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे तीननंतर टप्याटप्याने वळविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे जातील. वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. तेथून केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपास चौकातून उजवीकडे वळून मगरपट्टा चौक, सोलापूर रस्ता, यवत, केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Nivali-Haatkhamba villagers protest demanding cancellation of flyover at Nivali
निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा या मागणीसाठी निवळी-हातखंबा ग्रामस्थांचे आंदोलन
Transport Minister Pratap Sarnaik expressed wish that Eknath Shinde should get post of guardian minister of Thane district
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनीच स्विकारावे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची इच्छा
Police dispute escalates opposition to cancellation of transfer of new police officers
पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध
Akhilesh Shukla police
कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत
devendra fadanvis
महायुतीच्या आमदारांची रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड : ‘जय सियाराम’चा नारा, मंगलमय वातावरण अन्‌ लाखो रामभक्तांची रथयात्रा!

बुधवारी (२४ जानेवारी) सकाळी पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर पदयात्रा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे.तेथून पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे. बुधवारी नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. नगरकडून पुण्यात येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. थेऊर फाटा, केसनंद, थेऊरमार्गे वाहतूक सोलापूर रस्त्याने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वाघोली परिसरातील वाहतूक वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी, केशवनगर, मुंढवा चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक येरवड्यातील चंद्रमा चौक, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे वाघोलीकडे वळविण्यात येणार आहे.

हेही वाचा : पुणे : आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी वाचविला जीव

एक हजार प्रसाधनगृहे; १०० टँकर

जरांगे यांच्यासह हजारो समर्थक वाघोलीतील चोखीदाणी, खराडी परिसरात मुक्कामी असणार आहेत. वाघोली येथील आर. के. फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्काम असणार आहे. तेथे एक हजार प्रसाधन गृह, रुग्णवाहिका, १०० पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

कडक बंदोबस्त

पुणे पोलिसांकडून पदयात्रेच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात राहणार आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह दोन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १२३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच एक हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत.

Story img Loader