पुणे : माथाडी कायदा बचावासाठी गुरुवारी मार्केटयार्ड बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट आहे. भाजीपाला बाजार बंद असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन , तोलणार, टेम्पो चालक-मालक संघटनेसह विविध संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पिंपरी : आठ मुली, वंशाला दिवा नाही, दुसऱ्या लग्नाचा विचार; पत्नीने दिली पतीची सुपारी…केले २० ते २१ वार

मार्केट यार्डमधील भाजीपाला बाजार बंद असल्याने बंद असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे शेतीमाल विक्रीस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. माथाडी कायदा बचावासाठी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. राज्यव्यापी बंद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुण्यातील संघटनांनी बंद पुकारण्याचा निर्णय कायम ठेवला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune marketyard closed by mathadi workers to save mathadi act pune print news rbk 25 css