पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात लॉटरी जाहीर केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे.
गेल्या महिन्यात ८ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. आता ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत नागरिकांना घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका याप्रमाणे
- म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६
- म्हाडाच्या विविध योजना – १८
- म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९
- पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८
- २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६
एकूण ४८७७ सदनिका