पुणे : जेवण न आवडल्याने बांधकाम मजुराला हातोडा मारून खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील उंड्री परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली. आरोपीने आणखी एकाच्या डोक्यात हातोडा मारल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली. शुभम शास्त्री सरकार (वय ६३, रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कमल नारायण मार्डी (वय ४९, रा. जियापूर, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली. कोंढवा भागातील उंड्री परिसरात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पावसाचा फटका! पुण्यात ‘इतकी’ कोसळली झाडे!

गृहप्रकल्पातील कामगार वसाहतीत सरकार, मार्डी राहायला आहेत. रविवारी दुपारी सरकार यांनी सहकारी बांधकाम मजुरांसाठी जेवण तयार केले. जेवणाची चव न आवडल्याने मार्डीने सरकारला शिवीगाळ केली. वादातून मार्डीने सरकारच्या डोक्यात शेजारी ठेवलेला हातोडा मारला. सरकारच्या नाकावर हातोडा मारण्यात आला. सरकार गंभीर जखमी झाले. आरोपी मार्डीने शेजारी असलेल्या रामप्रीत मंडल यांना हातोड्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सरकार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मार्डीला अटक करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune murder of a construction worker with hammer after dispute over the taste of food pune print news rbk 25 css