पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सॅल्सबरी पार्क परिसरात छापा टाकला. एनआयएच्या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने ठाणे शहरातील पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तपासात मिळालेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने पुण्यातील सॅल्सबरी पार्क परिसरात सोमवारी कारवाई करुन एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल संच जप्त करण्यात आला. दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.

हेही वाचा : पिंपरी : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारे जेरबंद; ज्वेलर्सलाही ठोकल्या बेड्या; ‘हे’ आहे कारण

यापूर्वी याप्रकरणात मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) यांना अटक करण्यात आली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune national investigation agency detain youth from salisbury park area pune print news rbk 25 css