पुणे : कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने किरकोळ कारणावरून पिस्तूल काढून राडा घातल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. सुरक्षारक्षकाकडे शस्त्र परवाना असून, त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि सात काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी प्रताप धर्मा टक्के (वय ३९, रा.कात्रज) याच्याविरुद्ध बुधवारी रात्री उशीरा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सौरभ तानाजी काळे (वय २७, रा. हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : द्रुतगती महामार्गावर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे

आरोपी प्रताप टक्के बुधवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हडपसर भागातील माळवाडी येथून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांबरोबर त्याचा वाद झाला. प्रतापने त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल तरुणांवर रोखले. शिवीगाळ करून त्याने दहशत माजविली. त्यानंतर घाबरलेल्या सौरभ आणि मित्रांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. प्रताप याच्याविरुद्ध रात्री उशिरा हडपसर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच शस्त्राचा धाक दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. आरोपी प्रताप गेल्या वर्षी आमदार रोहित पवार यांच्याकडे खासगी अंगरक्षक म्हणून काम करत होता. सध्या तो त्यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.