पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये असणाऱ्या जलसाठ्याबद्दल चिंता व्यक्त केली. “राज्यात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. पुणे जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची कमतरता असून येत्या काळात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांना याआधीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती बाबत पत्र दिले आहे. याकडे त्यांनी लक्ष द्यावे, पुढच्या ३ महिन्यांत पाण्याचे नियोजन सरकारने तातडीने करावे. पुण्याचे जिल्हाधिकारी व पालकमंत्री (अजित पवार) यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार करणार आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या काय होणार…

“महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. मागील वर्षी उजणी धरण १०० टक्के भरले होते. सध्या उजनी धरणात ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. पाण्याची कमतरता पुढच्या काही महिन्यांत येऊ शकते. याबाबत पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांना मी १ महिन्यापुर्वी पत्र लिहिलं होतं. पाण्याचा विषय सरकारने गंभीरपणे हाताळावा. पाण्याची कमतरता असल्याने बारामतीत नाईलाजाने टँकर सुरु करावे लागले. महाराष्ट्र सरकारने जातीने लक्ष घालावं”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाणी प्रश्नाबाबत पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ncp mp supriya sule will meet dcm ajit pawar soon on the issue of water crisis in pune district svk 88 css