पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ५५० कोटींची तरतूद महापालिकेने केली आहे. समाविष्ट गावांपैकी काही गावे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे. महापालिका हद्दीमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ आणि त्यानंतर जुलै २०२१ मध्ये २३ गावे अशा एकूण ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये पायाभूत सुविधा तातडीने दिल्या जातील, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र रस्ते, सांडपाणी वाहिन्या, पाणीपुरवठा, वीज अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अपयश आले होते. त्यातच महापालिकेने येथील मिळकतींना तिप्पट दराने मिळकतकर आकारणी केली आहे. त्या विरोधातही स्थानिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना दिलासा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा