पुणे : उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाहण्यास मिळत आहे.

त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौर्‍यावर होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमधील घटना पाहिल्यावर एकच दिसून येते. ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. त्यांचे (भाजपचे) आमदार म्हणतात पोलिसांना मारा, आता तर त्यांचेच आमदार पोलिस स्टेशनमध्ये अधिकार्‍यांसमोर गोळीबार करतात. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही. मागील वर्षी देखील गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील व्यक्तींना क्लिन चिट देण्याचं पाप या सरकारने केले आहे. आता तर थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार, त्यामुळे याला गँगवार म्हणावं लागेल. आजपर्यंत सिनेमात पाहत होतो. आता ते वास्तवात आणि रस्त्यावर सुरू झाले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Jayashree Thorat, case registered against Jayashree Thorat,
अहमदनगर : आंदोलन करणाऱ्या जयश्री थोरात आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
NCP Sharad Pawar or NCP Ajit Pawar will fight in Vadgaon Sheri and Hadapsar constituencies in pune
शहरातील ‘या’ मतदारसंघात होणार ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ लढत!
vasai police officer transfer
वसई: दिवाळीच्या तोंडावर पोलीस अधिकारी अस्वस्थ; आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार
political twist in the suicide of a professional DJ
बीड, नगर जिल्ह्यात दरोडा घालणारे गजाआड, गु्न्हे शाखेची कारवाई
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश
Ballarpur to Congress and Chandrapur to Nationalist Congress Party
बल्लारपुर काँग्रेसकडे तर चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे
Eknath Shinde
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा! निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन

हेही वाचा : देशभरातील आरटीओमध्ये ऑनलाइन खोळंबा ! परवान्याशी निगडित सर्व सेवा ठप्प

आज आपापसात सुरू आहे. उद्या तुम्हाला आणि मला हे लोक गोळ्या मारतील. त्याच बरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांचं हे अपयश असून महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही जायचं कोणाकडे असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर मी उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणा विरोधात दिल्लीत आवाज उठविणार असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.