पुणे : पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) छात्र प्रथम महाले याचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी आंतरस्क्वाड्रन बॉक्सिंग स्पर्धेवेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एनडीएने याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : कारागृहातील मित्राला जामीनावर बाहेर काढण्यासाठी घरफोडीचे गुन्हे; पुणे, सातारा शहरात घरफोड्या, १२ लाखांचा ऐवज जप्त

महाराष्ट्राचा रहिवासी असलेला प्रथम महाले २०२१ मध्ये एनडीएमध्ये दाखल झाला होता. एनडीएतील १४५ व्या तुकडीचा छात्र होता. १६ ऑक्टोबर रोजी आंतरस्क्वाड्रन बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान प्रथमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. डोक्यातील रक्तस्राव रोखण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करूनही त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.