पुणे : परराज्यातून होणारी आवक कमी झाल्याने लसूण, गाजर, मटारच्या दरात वाढ झाली. कांदा, काकडी, ढोबळी मिरचीचे दर तेजीत आहेत. आवक वाढल्यााने शेवग्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (८ सप्टेंबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ७० ते ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून ४ ते ५ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ७ ते ८ टेम्पो गाजर, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार १०० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ५० ते ६० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५० ते ५५ टेम्पो बटाट्याची आवक झाली.

हेही वाचा : Ajit Pawar on Baramati Elections: “मीही आता ६५ वर्षांचा झालोय”, अजित पवारांचं बारामतीमध्ये सूचक विधान; म्हणाले, “पिकतं तिथे विकत नसतं”!

गणेशोत्सवामुळे फळांना मागणी

गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सीताफळ, खरबूज, कलिंगड, पपई, चिकू,पेरुच्या दरात वाढ झाली असून, लिंबांचा दरात घट झाली आहे. अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंबाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी केरळहून अननस ८ ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री ७० ते ८० टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे एक हजार ते १२०० गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू दोन हजार खोकी, पेरू एक हजार ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट). सीताफळ २० ते २५ टन अशी आवक झाली.

हेही वाचा : आळंदी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन

फुलांचे दर तेजीत

गणेशोत्सवामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कर्नाटक परिसरातून फुलांची आवक होत आहे. मागणी वाढल्याने सर्व फुलांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील फुलांचे दर पुढीलप्रमाणे – झेंडू- ५०-१००, गुलछडी (सुट्टी) – ८००-१५००, अष्टर – जुडी ४० ते ६०, सुट्टा १५० ते २५०, शेवंती – १५०-२५०, (गड्डीचे दर) गुलाबगड्डी – ४०-६०, गुलछडी काडी- १००-१५०, डच गुलाब (२० नग) – १५० ते २२०, जर्बेरा – ७० ते १००, कार्नेशियन – १५०-२५०, शेवंती काडी- ३००-४००, लिलियम (१० काड्या) – ८००-१०००, ॲार्चिड – ३५०-६५०, जिप्सोफिला- २५०-४००, जुई – १००० ते १२००.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune onion garlic cucumber flower peas expensive due to decrease in demand pune print news rbk 25 css