पुणे : ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. दशरश सुरेश मेढे (वय ३१, रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

मेढे याला दारू पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री दारू प्यायल्यानंतर त्याने कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. तो अस्वस्थ झाल्याने त्याला कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तो वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये उपचार घेत होता.

शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.