पुणे : पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे.या तीन मृतांमध्ये 22 वर्षाचा तरुण,एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.तर हे दोघे जण बहिण भाऊ आहेत.या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारु पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष आणि वैभव रितेश पवार वय 2 वर्ष या तीन जणांची मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर रविवारी रात्री नऊ जण झोपले होते.त्या रस्त्यावरून रात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे याने त्याच्या ताब्यातील MH 12 VF 0437 या क्रमांकाच्या डंपर ने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांच्या अंगावर डंपर घातले.
हेही वाचा…मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू
तर या घटनेमध्ये विशाल विनोद पवार,वैभवी रितेश पवार आणि वैभव रितेश पवार या तिघांचा जागीच मृत्यू झाला.तर या तीन मृतांमध्ये वैभवी आणि वैभव बहिण भाऊ आहेत.जानकी दिनेश पवार,रिनिशा विनोद पवार,रोशन शशादू भोसले, नगेश निवृत्ती पवार,दर्शन संजय वैराळ आणि आलिशा विनोद पवार हे सहा जण जखमी झाले आहे.या घटनेतील जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे याने मद्यपान केल्याचे तपासात समोर आले असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील सर्वजण कामाच्या शोधात अमरावतीहून पुण्यात कालच आले होते.