पिंपरी : मुळा आणि पवना नदीला पूर आल्यानंतर नदीकाठच्या रहिवाशांना दर वर्षी स्थलांतरित व्हावे लागते. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीला पूर आल्याने मधुबन, मुळानगरसह नदीकाठच्या एक हजारहून अधिक रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेतील निवारा केंद्रात स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) भेट घेतली. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी महापौर उषा ढोरे या वेळी उपस्थित होते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; मोरया गोसावी गणपती मंदिरात शिरले पाणी |Pimpri-Chinchwad

मुख्यमंत्री शिंदे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. दर वर्षी पावसाळ्यात घरात पाणी जाते का, किती लोकांचे स्थलांतर झाले, महापालिकेकडून जेवणासह सर्व सोयी-सुविधा मिळतात का, याची चौकशी केली. या संकटाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तुमचे म्हणणे काय, अशी विचारणा केली. त्यावर काहींनी सीमाभिंत बांधण्याचे सुचविले, तर काहींनी पुनवर्सनाची मागणी केली. पूरपरिस्थितीमुळे दर वर्षी स्थलांतरित व्हावे लागत असलेल्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा

मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी चर्चा केली. कोणकोणत्या वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत, औषधांची कमतरता आहे का, जलजन्य आजारांची परिस्थिती काय आहे, पूरग्रस्त भागातील रहिवाशांची वैद्यकीय तपासणी केली आहे का, याची माहिती घेतली.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवड शहरात दोन हजारांपेक्षा जास्त खड्डे; शरद पवार गटाचे अनोखे आंदोलन

खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची धावपळ

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी सांगवीतील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांना खड्डे दिसू नयेत यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा परिसरातील खड्डे दुरुस्त केले गेले. खडी, मुरुम, माती टाकून रस्ते बुजविले.