पुणे : फलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गाला अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी या प्रकल्पाचा नुकताच आढावा घेतला आहे. त्यामुळे लवकरच या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हा रेल्वेमार्ग १०५ किलोमीटरचा असणार आहे. सरव्यवस्थापक यादवी यांनी फलटण स्थानकाची पाहणी करून भविष्यातील विकास आणि प्रकल्पांच्या सद्य:स्थितीवर नुकतीच चर्चा केली. यावेळी खासदार रणजित नाईक निंबाळकर, उपस्थित होते. यानंतर यादव यांनी लोणंद ते फलटण रेल्वे गाड्यांचा वेग वाढवणे, बहुप्रतिक्षित फलटण ते बारामती विभाग आणि फलटण ते पंढरपूर नवीन मार्गिका सुरू करणे यासह प्रकल्पांबाबत चर्चा केली. नीती आयोगाच्या मंजुरीनंतर पुढील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांचा खर्च एकूण २ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे.
फलटण ते पंढरपूर रेल्वेला गती! लवकरच कामाला मंजुरी मिळण्याची चिन्हे
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी या प्रकल्पाचा नुकताच आढावा घेतला आहे. त्यामुळे लवकरच या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
Updated: या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-02-2024 at 21:01 IST
TOPICSपुणे न्यूजPune Newsमध्य रेल्वेCentral Railwayमराठी बातम्याMarathi Newsरेल्वेRailwayरेल्वे प्रवासीRailway Passengersरेल्वे स्टेशनRailway Station
+ 2 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune phaltan to pandharpur railway line may get approval soon pune print news stj 05 css