पुणे : महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपी बस चालकाला मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी वानवडी भागात घडली. पीएमपी बस आणि कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर पीएमपी चालक बसमधून उतरुन त्याने डंपरचे छायाचित्र काढले. छायाचित्र काढून पाठीमागे जात असतानाच डंपरचालकाने वाहन सुरू केल्याने अपघात झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय मच्छिंद्र देशमुख असे अपघातात मृत्यू झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक रजत किशोर बाभुळकर (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वानवडीतील संविधान चौकात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बस कात्रजहून हडपसरकडे निघाली होती. वानवडीतील संंविधान चौकातून कचरा वाहतूक करणारा डंपर निघाला होता. डंपर बसला घासून गेल्याने आरसा तुटला. अपघातानंतर डंपरचालक न थांबता पुढे गेला. आरसा तुटल्याने पीएमपी चालक देशमुख यांनी तेथून निघालेल्या दुचाकीस्वारला थांबविले. दुचाकीस्वारासह देशमुख यांनी डंपरचालकाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्यांनी डंपर थांबविला. त्यानंतर देशमुख यांनी त्यांच्या मोबाइलमधील कॅमेऱ्यांतून डंपरचे छायाचित्र काढले. छायाचित्र काढून पाठीमागे जात असतानाच डंपरचालक बाभुळकर याने डंपर सुरू करून पुढे घेण्याचा प्रयत्न केला. देशमुख हे डंंपरच्या मागच्या चाकाखाली सापडले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपरचालक याला ताब्यात घेतले.