पुणे : महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधीक्षक अभियंता प्रकाश कुरसुंगे (वय ४८, रा. विमाननगर), स्नेहल बोंद्रे (वय ३६, रा. कोथरुड), विकास धावरे (वय ३०, रा. धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला अपंग असून, महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयात लिपिक आहेत.
हेही वाचा : पिंपरी महापालिकेचे मनुष्यबळ वाढणार; नोव्हेंबरअखेर ३६८ कर्मचारी रुजू होणार
अधीक्षक अभियंता कुरसुंगे यांनी महिलेच्या कामात चुका काढून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. महिला दिव्यांग असल्याने तिची दुसऱ्या कार्यालयात बदली करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन केले. तक्रारदार महिला अपंग असल्याने सहकारी बोंद्रे, धावरे यांनी त्यांचा तिरस्कार केला. त्यांना त्रास दिला. धावरे याने महिलेच्या खुर्चीवर खाज येणारी भुकटी टाकली. भुकटीमुळे महिलेला त्रास झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.