पुणे : वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तोतया डाॅक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पांडुरंग बबनराव देवडकर (वय ४०, रा. पायस सोसायटी, लोकमान्यनगर, नवी पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत डाॅ. गोपाळ उजवनकर (वय ३८) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवडकर याच्याकडे वैद्यकीय पदवी नसताना नाडी परीक्षण करुन तो नागरिकांना ओैषध देत होता. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तेव्हा देवडकर याच्याकडे वैद्यकीय पदवी, तसेच व्यवसायाचे प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (१) उल्लंघन केल्याप्रकरणी देवडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

हेही वाचा…कल्याणीनगर अपघात प्रकरण : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी

i

शहर, परिसरात वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय करणाऱ्या तोतया डाॅक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव येथे बनावट नाव आणि वैद्यकीय पदवीचा वापर करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेहमूद फारुक शेख याला अटक करण्यात आली हाेती. शेख महेश पाटील या बनावट नावाने रुग्णालय चालवत होता. शेखचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. दहावीनंतर नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात तो कंपाउंडर म्हणून काम करीत होता. मुंढवा केशवनगर भागातील पी. रामकृष्ण रेड्डी (वय ६६). तो शस्त्रक्रिया विभागात मदतनीस होता. निवृत्तीनंतर त्याने उत्तर प्रदेश येथून एका संघटनेकडून प्रमाणपत्र घेऊन मुंढवा भागात दवाखाना थाटल्याचे उघडकीस आले होते. जुलै महिन्यात लोणी काळभोर भागात तोरणे नावाच्या तोतया डाॅक्टरला अटक करण्यात आली होती. वारजे भागात मूळव्याधीवर उपचार केंद्र चालविणाऱ्या तोतयाला अटक करण्यात आली होती.