पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. अपघात नेमका कसा झाला, याबाबतची माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी दुर्घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज कुमार (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मनोज कुमार सोमवारी (१ जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन निघाले होते. त्यावेळी ते अचानक जिन्यावरुन पडले. मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांनी हा प्रकार पाहिला आणि तातडीने सरकत्या जिन्याची यंत्रणा बंद केली. त्यांना मेट्रो स्थानकातील वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. मनोज कुमार गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने मेट्रोतील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात हलविले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना; पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनोज कुमार यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यांचा मृत्यूमागचे कारण शवविच्छेदन अहवालातून समजेल. ते जिन्यावरुन कसे पडले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. या घटनेची मेट्रो अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, सरकत्या जिन्याची तपासणी करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune police seized cctv footage of metro station after death of a passenger after falling from elevator pune print news rbk 25 css