पुणे : गणेशोत्सवातील आणि प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा धडकी भरविणारा दणदणाट, ढोल-ताशा पथकांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि मिरवणुकीत लेझरच्या वापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविरोधात राजकीय पक्षही एकवटले आहेत. संस्कृतीचे पालन करताना सामाजिक भान हवेच, अशी भूमिका घेत राजकीय पक्षांनी या विरोधात आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उत्सवातील नियमांचे पालन व्हावे आणि आचारसंहिता असावी, यासाठी राजकीय नेत्यांना आणि पोलिसांना निवेदन देणार असल्याचेही राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणुकीतील वातावरण अत्यंत क्लेशदायक आहे. उत्सवातील धार्मिकता, परंपरा मागे पडत चालली आहे. उत्सवासाठी काही नियम आहेत. मात्र कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी काही निर्णय घेतले जातात. पोलिसांना मुक्तपणे कारवाई करू दिली जात नाही. गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राजकीय दबावाखाली घेतला जातो. वास्तविक उत्सवातील डीजेंवर निर्बंधच हवेत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. उत्सवातील आवाजामुळे अनेकांना त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत. – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस</p>

हेही वाचा – पुण्यात ‘ई-टाॅयलेट’चे पुण्यस्मरण, नागरिकांनी निषेधाचे फलक लावत पालिकेला काढले चिमटे

Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Colonial hegemony through technological superiority
तंत्रकारण: तांत्रिक श्रेष्ठतेतून वसाहती वर्चस्ववाद
Why Bombay HC said use of loudspeakers is not essential to religion
लाऊडस्पीकरचा वापर कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले?
intra party discord seen during protest against ec organized by pune congress
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते वेठीला? शहरातील पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
necessary to consider hearing health separately
कानांचे सरावलेपण..

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील आवाज, डीजेमुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. मोठ्या आवाजामुळे माझ्यासमोर एक महिला बेशुद्ध पडली. मिरवणुकीत असताना मलाही डीजेचा त्रास झाला. वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषणाबाबत पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत. विसर्जन मिरवणुकीतील अनीष्ट प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढाकार घेण्यास तयार आहे. डीजे लावणार नाही, अशी शपथ आम्ही पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला तयार आहोत.- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संस्कृती जपताना सामाजिक भानही बाळगले पाहिजे. अलीकडच्या काही वर्षांत विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा उच्चांक होतो. डीजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने ते आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनीही त्याबाबत सातत्याने प्रबोधन केले आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र यावे लागणार आहे. विसर्जन मिरवणुकीतले गैरप्रकार थांबविण्यासाठी अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल. तसेच पोलीस आयुक्तांबरोबरही चर्चा करण्यात येईल. – प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट

मिरवणुकीत मर्यादित प्रमाणात स्पीकर हवेत. मात्र, राजकीय लाभासाठी सरसकट सूट देण्यात आली आहे. नियमात शिथिलता का आणली, याचे कोणी उत्तर देत नाही. लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी दिलेली सूट उत्सवाचा बेरंग करत आहे. सरकारने त्यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. बंदी नाही, पण कठोर नियम निश्चित हवेत. ढोल-ताशा पथके किती हवीत, याचा विचार झाला पाहिजे. मिरवणुकीमुळे काही जणांना त्रास झाल्याची उदाहरणे माझ्या डोळ्यांसमोर आहेत. या संदर्भात गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. – संजय मोरे, शहरप्रमुख, ठाकरे गट

विसर्जन मिरवणुकीतील चुकीच्या प्रकारांवर निर्बंध हवेत. सगळ्यांनी निर्बंधांचे पालन केले पाहिजे. आवाजासाठी निश्चित मर्यादा हवी. त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे. विसर्जन मिरवणूक वेळेत कशी संपविता येईल, याचा विचार मंडळे आणि राजकीय पक्षांनी करणे आवश्यक आहे. यापुढे लोकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. यासाठी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येईल. – नाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना

कोणताही उत्सव हा लोकांचा, लोकांसाठी असतो. तो साजरा करताना सामाजिक भान बाळगायलाच हवे. हिंदू सण मोठ्या प्रमाणावर साजरे झालेच पाहिजेत. मात्र, त्यातून कोणालाही त्रास होता कामा नये. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीही भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येईल. सार्वजनिक मंडळांबरोबर चर्चा करण्यात येईल. पोलीस आयुक्तांनाही निवेदन देण्यात येईल. – साईनाथ बाबर, शहरप्रमुख, मनसे

हेही वाचा – मुंबई-पुण्याची आघाडी! देशातील घरांच्या विक्रीत निम्म्याहून अधिक वाटा

उत्सव हा लोकांचा आहे. लोकांना त्रास व्हावा, अशी कार्यकर्त्यांची भूमिका नसते. लोकांत जाऊन उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात कधीही सामान्य पुणेकरांना त्रास झालेला नाही. पुणेकर सक्रीय सहभागी असतात. अपवादाने काही प्रकार घडला असेल, तर याचा अर्थ गणेशोत्सव बदनाम करणे चुकीचे आहे. संघटन व्हावे, हाच उत्सवाचा उद्देश आहे. ही परंपरा कायम राहिली आहे. आवाजाला मर्यादा आहेत. त्याचे पालन झाले पाहिजे. स्पीकर लावायचे नाही, वादन करायचे नाही, तर मिरवणुका काढायच्या कशा? – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजपा

भाजपामध्ये परस्परविरोधी भूमिका

गणेशोत्सवात, विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजाच्या मुद्द्यावरून शहर भाजपामधील परस्पर भूमिका पुढे आल्या आहेत. भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी वादन नाही, तर मग मिरवणूक काढणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला असतानाच भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मात्र विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिले आहे. निर्बंधमुक्त आवाजाने ध्वनिप्रदूषणाची उच्चांकी पातळी गाठली जात आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मानसिक स्वास्थ्यही बिघडत आहे. त्यामुळे निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करावी, बाजारातील पुरवठादारांना सूचना द्याव्यात, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

Story img Loader