पुणे : जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अगरवाल पिता-पुत्राचा भागीदार जसप्रीतसिंग राजपाल याला अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्यासह राजपालविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला होता.

कोंढवा भागातील जमीन व्यवहारात एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी फिर्याद दिली होती.

हेही वाचा : ससूनमधील डॉक्टरांवरील कारवाईसाठी प्रतीक्षाच, महाराष्ट्र वैद्यक परिषदेने पोलिसांसह वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अहवाल मागविला

राजपालला शनिवारी (८ मे) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने राजपालला रविवारपर्यंत (९ मे) पोलीस कोठडी सुनावली. राजपालच्या वतीने ॲड. हर्षवर्धन पवार यांनी बाजू मांडली.