पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे दौऱ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. मुर्मू यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभा पाटील यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आणि शाल देऊन गौरविले.

हेही वाचा : पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते, फूटपाथवर वाहने पडून; महापालिका करणार ही कारवाई

प्रताप परदेशी आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेल्या ‘बाल रक्षण कायद्याचे (पोस्को) अंतरंग’ या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुर्मू यांना प्रदान करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोर, जयेश राठोर आणि विनित परदेशी या वेळी उपस्थित होते.

Story img Loader