पुणे : पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली. कोथिंबिर, मेथी, कांदापातीसह पालेभाज्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली. टोमॅटो, शेवगा, ढोबळी मिरची, फ्लाॅवर आणि हिरवी मिरचीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. भुईमूग शेंगांची आवक वाढल्याने दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (२६ मे) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू कर्नाटकातून ४ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, पावटा ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ५ ते ६ ट्रक मटार, मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा : पुणे : रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण; काय आहे प्रकरण?

पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गावरान कैरी ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग २०० ते २५० गोणी, कांदा ८० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ३० ट्रक बटाटा अशी आवक झाली.

हेही वाचा : Porsche Accident: १५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून ताब्यात; आता पुढे काय होणार?

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडी अशी आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांच्या दरांमध्ये कोथिंबीर १५०० ते २५०० रुपये, मेथी १६०० ते २५०० रुपये, शेपू ८०० ते १५०० रुपये, कांदापात ८०० ते २००० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ८०० रुपये, पुदिना ३०० ते ८०० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ६०० रुपये, चुका ४०० ते ७०० रुपये, चवळई ३०० ते ८०० रुपये, पालक १००० ते ११०० रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune prices of vegetable increased due to decrease in supply of vegetable pune print news rbk 25 css