पुणे : सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात एका इमारतीत मोरया आयुर्वेद मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत मसाज पार्लरमधून तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : पुण्यातील साडेतीन हजार कोटींच्या मेफेड्रोन प्रकरणाचे काय झाले? कोणाकडे सोपवला तपास?

महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लरचालक जगदाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune prostitution at massage parlor in sinhagad road area three women detained pune print news rbk 25 css