पुणे: शहरात नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागाला पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून पुणे महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये रिपाइं चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर हे देखील सहभागी झाले होते.

हेही वाचा : pune crime news: वडगाव शेरीत टोळक्याची दहशत; दोघांवर कोयत्याने वार

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

यावेळी संजय सोनवणे म्हणाले की,पाण्याचा विसर्ग करताना पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त पुणे आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाच्या अभावामुळे शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधीत झाली आहेत. शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे पुरग्रस्तांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई द्यावी. प्रत्येक कुटूंबास २५ हजार रुपयांची तातडीची मदत करावी. पूरस्थिती हाताळण्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत, पुररेषा नव्याने आखण्यात यावी. पुरग्रस्तांचे खोटे पंचनामे करणारे अधिकारी, खोट्या लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करावी. तसेच येत्या काळातही नदीकाठच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवू नये,यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत,अशी मागणी यावेळी त्यांनी केली.