पुणे : नियामकांकडून दिवसेंदिवस वाढत असलेली मानके आणि जास्त कर यामुळे दुचाकीच्या किमती महागल्या आहेत. करोना संकटाच्या पूर्वीची विक्री पातळी अद्यापही दुचाकी बाजारपेठेने न गाठण्यामागे हे प्रमुख कारण आहे, अशी टीका बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात मागील काही काळात दुचाकीच्या किमती वाढल्या असून, सामान्य ग्राहकांसाठी त्या महागड्या बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राजीव बजाज म्हणाले की, नियामकांकडून सातत्याने नवीन मानके आणली जात आहे. सुरूवातीला बीएस-६ मानके आणण्यात आली. यामुळे दुचाकीचा उत्पादन खर्च वाढला. याचा फायदा प्रदूषण कमी होण्यात झाला असला तरी दुचाकीच्या किमती महागल्या. याचबरोबर १२५ सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींनी अँटी- लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) बंधनकारक आहे. यामुळेही उत्पादन खर्चात वाढ होऊन किंतम वाढली. या सर्व कारणांमुळे करोनापूर्व पातळी अद्याप दुचाकी विक्री गेलेली नाही.

हेही वाचा : बजाजची सीएनजी दुचाकी कधी बाजारात येणार? राजीव बजाज यांनी सांगितली तारीख…

दुचाकीवर २८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. जास्त कर असल्याने किमतीत वाढ होऊन ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागते. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात दुचाकी द्यावयाची झाल्यास त्यावरील कर कमी करायला हवा. सरकारने दुचाकीवरील जीएसटी १८ ते २० टक्क्यांवर आणावा. यामुळे किमती कमी होऊन दुचाकी ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतील, असे बजाज यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : आयटी हब हिंजवडीत स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका, पैशांचे अमिश दाखवून वेश्याव्यवसाय

भारतात दुचाकीवर २८ टक्के जीएसटी आहे. आशियातील इतर देशांचा विचार करता दुचाकीवर ८ ते १४ टक्क्यांपर्यत कर आकारला जातो. यातच नियामकांच्या नवीन मानकांमुळे दुचाकीच्या किमती वाढल्या आहेत.

राजीव बजाज, व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune rajeev bajaj told the reason of bikes are so costly in india pune print news stj 05 css