पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर निवड होण्याची शक्यता होती. मात्र अखेरच्या क्षणी अजित पवार यांनी रणजीत तावरे यांना संचालक पदाची संधी दिली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील लाभार्थी आनंदाचा शिधापासून वंचित… ‘एवढे’ नागरिक प्रतीक्षेत
या संचालकपदाच्या निवडीनंतर अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे संचालक पद रिक्त झाले होते. त्यानंतर संचालक पदासाठी निवडणुक जाहीर केल्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ११ वाजता होती. त्यावेळी रणजीत अशोक तावरे यांचा एकमेव अर्ज आल्याने, ही निवडणूक बिनविरोध होती. रणजीत अशोक तावरे यांची संचालक पदी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.