पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.सर्व ठिकाणी प्रचाराची धामधूम सुरू आहे.तर उद्या चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ,महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर,वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे, एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके या चार ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…मावळातील सरासरी मतदान ६० टक्केच, यंदा किती होणार मतदान?

तर या मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहेत.मात्र त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत. त्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस आणि निवडणुक आयोगाचे अधिकारी कारवाई करीत नाही. या भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलनास बसले आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या या आरोपावर भाजप नेत्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ravindra dhangekar did allegations on bjp workers of money distribution dhangekar start protests at sahakar nagar police station svk 88 psg