पुणे : प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बांधकामासाठी करण्याची सक्ती करण्यात आल्यानंतर ४ लाख ९० हजार लिटर सांडपाण्याचा वापर आतापर्यंत बांधकामासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापराला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बांधकाम प्रकल्पांसाठी करण्याची सक्ती महापालिकेने केली आहे. मात्र, उपयोजनद्वारे (ॲप) नोंदणी करून बांधकामांना पाणीपुरवठा करण्यास टँकरचालकांकडून टाळाटाळ होत असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे उपयोजनद्वारे नोंदणी करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यानुसार प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा… पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सचिंद्र प्रताप सिंह; ओमप्रकाश बकोरिया यांची बदली

शहरामध्ये सुरू असलेल्या सर्व बांधकामांना सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने उपयोजन विकसित केले आहे. शहरामध्ये ज्या विकसकांची बांधकामे सुरू आहेत, त्यांनी बांधकामाची जागानिहाय उपयोजनमध्ये नोंदणी करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे टँकरमालक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यास इच्छुक आहेत, त्यांनाही नोंदणी करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडला घेरले फेरीवाल्यांनी! दररोज ‘एवढे’ फेरीवाले करतात रस्ते काबीज

आतापर्यंत १४७ टँकरचालकांनी आणि ७६५ बांधकाम व्यावसायिकांनी या उपयोजनांतर्गत नोंदणी केली असून, ४ लाख ९० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बांधकामाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापालिकेच्या आठ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune recycled water from waste water used for building construction pune print news apk 13 asj
Show comments