पुण्यातील मतदार संघांच्या रचनेमध्ये वेळोवेळी बदल झालेले दिसतात. भवानी पेठ विधानसभा मतदार संघ हा पुण्याच्या मध्यवर्ती भागाचा समावेश असलेल्या परिसराचा मिळून तयार झालेला मतदार संघ होता. १९६७ पासून २००४ पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये सुरुवातीच्या काळात काँग्रेसला या मतदार संघात यश मिळालेले दिसते. काँग्रेसचे टिकमदास मेमजादे हे सलग दोनवेळा निवडून आले होेते. १९७८ च्या निवडणुकीत मात्र जनता पक्षाचे भाई वैद्या हे विजयी झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे अमिनुद्दीन पेनवाले हे एकदा निवडून आले. या मतदार संघावर प्रकाश ढेरे यांचे प्राबल्य होते. ते एकदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर या मतदार संघातून विजयी झाले होते. १९९० नंतर काँग्रेसची या मतदार संघावरील पकड ढिली होत गेली आणि १९९५ आणि १९९९ अशा सलग दोनवेळा तत्कलीन शिवसेनेकडून दीपक पायगुडे यांनी विजय साकारला. २००४ च्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमल ढोले पाटील या विजयी झाल्या. त्यानंतर हा मतदार संघ अस्तित्त्वात राहिला नाही. या मतदार संघातील काही भाग कसबा पेठ, पुणे कॅन्टोमेेंट विधानसभा मतदार संघात जोडला गेला आणि हा मतदार संघ इतिहासजमा झाला.

बोपोडी विधानसभा मतदार संघ हा १९७८ पासून २००४ पर्यंत होता. हा मतदार संघ कायम काँग्रेसला विजय मिळवून देणारा होता. रामभाऊ मोझे यांनी १९८५ पासून सलग तीनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९९९ आणि २००४ मधील निवडणुकांमध्ये काँग्रेसचे चंद्रकांत छाजेड हे विजयी झाले होते. त्यानंतर या मतदार संघाचे अस्तित्त्व संपले. मुळशी विधनसभा मतदार संघ हा १९७२ ते २००४ पर्यंत होता. या मतदार संघातून नामदेवराव मते हे दोनवेळा, माजी खासदार विदुला नवले हे एकदा, तर माजी खासदार अशोक मोहोळ हे सलग तीनवेळा निवडून आले होते. तोपर्यंत हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात होता. १९९९ च्या निवडणुकीत तत्कालीन रार्ष्ट्वइादी काँग्रेसचे कुमार गोसावी हे विजयी झाले. २००४ च्या निवडणुकीत या मतदार संघातून तत्कालीन शिवसेनेचे शरद ढमाले यांनी विजय साकारला. त्यानंतर हा मतदार संघ राहिला नाही. या मतदार संघाचा काही भाग हा खडकवासला आणि काही भोर विधानसभा मतदार संघाला जोडला गेला.

Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

हेही वाचा : मावळ विधानसभा: “भाजपने आमच्यात लुडबुड करू नये…”, आमदार सुनील शेळकेंनी भाजपला सुनावले

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने त्याचे विभाजन करून २००९ मध्ये कोथरुड विभानसभा मतदार संघ तयार करण्यात आला. शिवाजीनगर हा मतदार संघ हा कायम भाजप आणि शिवसेना युती असताना युतीला साथ देणारा होता. येथून भाजपचे अण्णा जोशी, शिवसेनेचे शशिकांत सुतार हे दोनवेळा निवडून गेले. विनायक निम्हण यांनी शिवसेनेकडून दोनवेळा आणि एकदा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होत या मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केले. मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. विजय काळे आणि विद्यामान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले.

या मतदार संघातून विभाजन करून तयार करण्यात आलेला कोथरुड विधानसभा मतदार संघ हा कायम भाजप आणि शिवसेनेला हमखास यश मिळवून देणारा झाला आहे. भाजप-शिवसेनेची युती तुटल्यावर भाजपकडे हा मतदार संघ राहिला आहे. हा मतदार संघ तयार करण्यात आल्यावर पहिल्या निवडणुकीत युतीतर्फे शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे विजयी झाले. त्यानंतर मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील हे विजयी झाल्याने हा मतदार संघ हा भाजपचे प्राबल्य असलेला झाला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना करून हडपसर हा मतदार संघ २००९ मध्ये तयार झाला. पुणे कॅन्टोमेंट या मतदार संघातील मतदारांचा कल हा संमिश्र राहिला आहे. १९७८ पासून १९८५ पर्यंतच्या सलग तीन निवडणुकांमध्ये जनता पक्षाकडून विठ्ठल तुपे निवडून गेले होते. काँग्रेसचे चंद्रकांत शिवरकर यांनी तीनवेळा प्रतिनिधित्त्व केले आहे. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सूर्यकांत लोणकर निवडून गेले होते. मागील दोन निवडणुकांमध्ये हा मतदार संघ भाजपकडे राहिला आहे. हडपसरमध्ये २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे महादेव बाबर, त्यानंतर भाजपचे योगेश टिळेकर आणि मागील निवडणुकीत रार्ष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी झाल्याने हा मतदार संघही कोणत्याही एका पक्षाला यश मिळवून देणारा राहिलेला नाही.

हेही वाचा : पुणे: पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, सिंहगड रस्ता परिसरात कारवाई; दोन पिस्तूल, काडतुसे जप्त

पुणे महापालिकेच्या हद्दीत नवीन गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर खडकवासला, वडगाव शेरी हे नवीन मतदार संघ तयार करण्यात आले. खडकवासला मतदार संघ २००९ मध्ये तयार करण्यात आल्यावर पहिल्या निवडणुकीत मनसेकडून रमेश वांजळे हे विजयी झाले. त्यानंतर भाजपचे भीमराव तापकीर हे सलग तीन वेळा निवडून आल्याने हा मतदार संघातही भाजपबहुल मतदार जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडगाव शेरी हा मतदार संघ २००९ मध्ये निर्माण करण्यात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. बापू पठारे हे या मतदार संघातील पहिले आमदार झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपचे जगदीश मुळीक, तर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील टिंंगरे विजयी झाले. त्यामुळे या मतदार संघातील मतदारांचा कल हा कायम बदलत असलेला दिसतो.

एकंदरीत विजय मिळविण्यासाठी मतदार संघांची पुनर्रचना करण्याचे प्रयोग सातत्याने करण्यात येत असले, तरी आता मतदारांचा कल हा बदलत चाललेला दिसून येतो. पुण्यात सध्या कोथरुड आणि पर्वती हे दोन भाजपला यश मिळवून देणारे मतदार संघ असल्याचा अंदाज वर्तविला जातो. अन्य मतदार संघात हमखास यशाची खात्री कोणत्याच पक्षाला देता येणार नाही, अशी स्थिती आहे.

sujit.tambade@expressindia. com