पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (रिपाइं) आक्रमक भूमिका घेऊन मंगळवारी त्यांच्या घरासमोर आंदोलन केले.

पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनावणे आणि प्रदेश संघटक परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे, महेंद्र कांबळे, मंदार जोशी, बसवराज गायकवाड, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महिपाल वाघमारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

‘ज्यांनी राजर्षी शाहू महाराजांची भूमिका केली, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत, याची माहिती असूनही त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी,’ अशी मागणी वाडेकर यांनी केली. सोनावणे म्हणाले, ‘सोलापूरकर यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. ते महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीस आणि राज्य सरकारने त्यांना पाठीशी घालू नये. त्यांचे पोलीस संरक्षण कमी करण्यात यावे.’

Story img Loader