पुणे : संततधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे. लागवड कमी झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालकासह सर्व पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. कोथिंबिरीसह मेथी, पालक या पालेभाज्यांना उच्चांकी दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार कोथिंबिरीच्या एका जुडीला ६० ते ८० रुपये दर मिळाला आहे. मेथी जुडीला ५० रुपये दर मिळाला असून, पालकही तेजीत आहे.

पुणे विभागात पावसाची संततधार आहे. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. सध्या मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे. कोथिंबीर, मेथी, पालकसह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती छत्रपती श्री शिवाजी मार्केट यार्डमधील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
farm distress maharashtra election
विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?
ginning pressing loksatta article
विश्लेषण: राज्यातील सहकारी जिनिंगप्रेसिंग संस्था घसरणीला?
Due to increase in demand prices of guar cabbage brinjal groundnuts peas increased
गवार, कोबी, वांगी, मटार महाग
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
The election commission announced the schedule of campaign expenses
शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये; निवडणूक आयोगाकडून प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर
MSP on agricultural produce
विश्लेषण : शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?

हे ही वाचा…पुणे: एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपावर सतेज पाटील यांची टीका, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ…’

पुणे विभागातून सध्या पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. पालेभाज्या डागाळल्या आहेत. चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना दर मिळाले आहेत. घाऊक बाजारात मेथी, कोथिंबीर, पालकासह सर्व पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची नवीन लागवड होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर गणेशोत्सवापर्यंत तेजीत राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा…सुषमा अंधारे यांना ‘या’ मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून पुण्यात लागले फ्लेक्स

कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. पुणे विभागात संततधार पाऊस सुरू असल्याने पालेभाज्या खराब झाल्या आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर ४० ते ४५ रुपयांपर्यंत आहे. वाहतूक खर्च, हमाली असे खर्च विचारात घ्यावे लागतात. परराज्यांतून होणारी कोथिंबिरीची आवक सध्या बंद आहे. पावसामुळे लातूर भागातील कोथिंबिरीचे नुकसान झाले आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, पालकवगळता अन्य पालेभाज्यांचे दर २५ ते ४० रुपयांपर्यंत आहेत. प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार पुणे विभागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. नवीन लागवडीस किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. गणेशोत्सवातही पालेभाज्या तेजीत राहण्याची शक्यता आहे. राजेंद्र सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

पालेभाज्यांचे दर

कोथिंबिर – ६० ते ८० रुपये
पालक – ६० ते ७० रुपये

मेथी – ५० रुपये