पुणे: ऐन दिवाळीत शहरात गोळीबाराची घटना घडली. येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एका टेम्पो चालकावर बंदुकीतून गोळीबार केला. उपचारादरम्यान टेम्पो चालकाचा मृत्यू झाला.गुरुवारी रात्री उशीरा येरवड्यातील अशोकनगर परिसरात ही घडली. शहानवाज शेख असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त लष्करी जवान श्रीकांत पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : अंकुश चिंतामण, हेमंत पाटील यांना, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
येरवडा भागांतील अशोकनगर परिसरात पाटील आणि शहानवाज यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. रागातून पाटील याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले . या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.आरोपी पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त हिमात जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
© The Indian Express (P) Ltd